ऐरोली विधानसभेवर शिवसेनेचा दावा !
ऐरोली विधानसभेवर शिवसेनेचा दावा !
ऐरोली विधानसभेवर शिवसेनेचा दावा !
ऐरोली विधानसभेची मागणी करण्यासाठी सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांनी सही केलेले पत्र शिवसेनाप्रमुख मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन दिले. यावेळी ऐरोली विधानसभेचे आत्ताच झालेल्या लोकसभा निवडनुकीतील चांगले प्रदर्शन लक्षात घेता हा मतदारसंघ शिवसेनेला लढण्यासाठी मिळावा असे निवेदन सर्व पदाधिकार्यांनी केले. मागील निवडणूकीत सर्वात जास्त नगरसेवक असतानाही हा मतदार संघ भाजप ला देण्यात आला होता. यामुळेच गणेश नाईक मोठ्या आघाडीने विजयी झाले होते. आता भाजप सोबत फारकत घेतल्यानंतरही लेकसभा निवडनुकीतील ऐरोली विधानसभेतील मतदानानुसार आमदार गणेश नाईंक यांना मागील मतदानाएवढी आघाडी राखता आली नाही. यामुळे ऐरोली विधानसभेतील शिवसेनेला मानणारा मतदार मा.उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे असे चित्र दिसून येत आहे. यामुळे शिवसेना उ.बा.ठा. पक्षातील अनुभवी नेत्यांची फळी लक्षात घेता हा मतदार संघ शिवसेनेला सुटल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे हे पदाधिक्रार्यांनी पक्षप्रमुखांच्या निदर्शनास आनून दिले. यानुसार हा मतदार संघ नक्की शिवसेनेला सुटेल हा विश्वास पक्षप्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीतून पदाधिकार्यांमध्ये निर्माण झाला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख श्री.द्वारकानाथ भोईर,,शहर प्रमुख श्री.प्रविण म्हात्रे,श्री.एम.के.मढवी, उपजिल्हाप्रमुख श्री.सुर्यकांत मढवी,श्री.संजय तुरे,श्री.प्रकाश पाटील,श्री.आत्माराम सणस,श्री.संकेत डोके व इतर शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे ऐरोली मतदार संघातून महाविकास आघाडीचा निवडून येणारा आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावान शिवसैनिक असेल अशी खात्री बाळगण्यास हरकत नाही.