अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर पुर्ननियुक्ती.
अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर पुर्ननियुक्ती.
KTG समाचार प्रकाश माने नवी मुंबई
मुंबई,दि.17:- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी पुर्ननियुक्ती करून या पदाला मंत्री पदाचा दर्जा दिल्याचा शासन निर्णय क्रमांक अपामं-2022/प्रक्र-154/का-5425,दि.17 ऑक्टोबर,2022 महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने काढला.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना देवेंद्रजी फडणीससाहेब यांनी सन 2018 मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित करून या महामंडळाच्या अध्यक्ष पदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणुक केली होती व या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला होता.
महामंडळाच्या अध्यक्ष पदी नेमणुक झाल्यानंतर नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजातील तरूण-तरूणींना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळण्याकरीता महाराष्ट्रभर विविध तालुके व जिल्ह्याचे दौरे करून उदयोजक होण्यासाठी प्रयत्न केले. महामंडळाचे अध्यक्ष असताना सन 2018 ते सन 2020 या कालावधीमध्ये त्यांनी ५० हजार मराठा उदयोजक तयार करण्याचे लक्ष्य गाठले होते. त्यांच्या कर्तव्यदक्ष मेहनतीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची महामंडळावर पुनर्निंयुक्ती करून काम करण्याची संधी दिली आहे.
दि २५ सप्टेंबर २०२२ रोजी माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील याच्या 89 व्या जयंतीनिमित्त नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या माथाडी कामगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांची महामंडळावर अध्यक्ष म्हणून पुर्ननियुक्ती करण्याची अधिकृत घोषणा केली होती, त्यानुसार नियोजन विभागाने नियुक्तीचा आदेश काढला आहे.
राज्य शासनाने मा.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती केल्याने तमाम माथाडी कामगार व मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महामंडळावर वरील अध्यक्षपदाची निवड ही भावनकि आहे, अण्णासाहेबांच्या नांवे असलेल्या महामंडळाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्यासाठी पुन्हा मिळालेली संधी हे पुर्वी केलेल्या कार्याची पोहचपावती आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देणे तसेच मराठा समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उद्यमशील तरूण तरूणींना महामंडळामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन लाखो मराठा उद्योजक निर्माण करणे हा एकच उद्देश असेल असे मत महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आणि महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविल्याबद्दल मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले. नियोजन विभागातून अध्यक्ष पदाच्या नियुक्तीचा आदेश मिळताच नरेंद्र पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली.