कोकणातील पूरग्रस्तांना माय मराठी फाऊंडेशन चा मदतीचा हात.
कोकणातील पूरग्रस्तांना माय मराठी फाऊंडेशन चा मदतीचा हात.
मागच्या काही दिवसांत कोकणात झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. अनेक घरांचे नुकसान झाले काहींनी आपल्या कुटुंबातील सदस्य यात गमावले. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी माय मराठी फाऊंडेशन (रजि.) ने मदतीचा एक हात पुढे केला असून यातून बाहेर पडण्यासाठी कोकणवासीयांना मदत दिली आहे.
मागच्या काही दिवसांत कोकणात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करत असताना अनेक सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, दानशूर लोकांनी पुढे येऊन आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत करत आहेत. मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या माय मराठी फाऊंडेशन( Maay Marathi Foundation ) ने ही आपल्या मराठी , कोकणी बांधवाना यातून सावरण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत करून मदतीचा एक हात पुढे केला आहे. यापूर्वीही अनेक नैसर्गिक आपत्तीत माय मराठी फाऊंडेशन ने राज्यात अनेक ठिकाणी मदत केली असून फाऊंडेशन मधील सर्व सदस्यांनी आपले कर्तव्य समजून कोकणवासीयांना आपली मदत सुपूर्द केली.
माय मराठी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मंगेश मिस्कीन यांच्या नेतृत्वाखाली ही मदत देण्यात आली. मुंबईतून फाऊंडेशन चे पदाधिकारी, सभासद यांच्या उपस्थितीत ही मदत गाडीत भरून कोकणाकडे फाऊंडेशन च्या काही सभासदांसोबत पाठवण्यात आली. गरजू कुटुंबांना याचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या किट मध्ये गहू तांदूळ,तेलाची पिशवी,मीठ,साबण,कोलगेट,
ब्रश, सॅनिटरी पॅड, बिस्कीट बॉक्स ,ब्लॅंकेट ,टॉवेल,मच्छर अगरबत्ती, माचीस बॉक्स मास्क,पाण्याचे बॉटल बॉक्स , सॅनिटाइझर ई. जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.तसेच यावेळी चिपळूण शहरातील मध्यवर्ती पोलीस स्टेशन ला भेट देऊन पोलीस बांधवासाठी पाणी बॉटल बॉक्स वाटप करण्यात आले..यावेळी फाऊंडेशन चे सदस्य विशाल बामणे, ज्ञानेश्वर भालेकर, उपेश ओंबळे, प्रवीण पांचाळ, अनिल शिंदे पाटील, स्वप्नील मढवी,मंगेश धंद्रे उपस्थित होते. या कामात फाऊंडेशन ला सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे व समाजातील दानशूर व्यक्तींचे माय मराठी फाऊंडेशन ने आभार मानले आहेत.