नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख

नवी मुंबई  उपजिल्हा प्रमुख

कृपया प्रसिद्धीसाठी

                         नुकताच ‘भाजप’ मधून ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षात प्रवेश केलेले नवी मुबईतील युवा नेते संकेत नारायण डोके यांना पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख या पदावर शिवसेना प्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते मा.श्री.राजनजी विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख मा.श्री.द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत नवी मुंबई शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संकेत डोके यांच्या यापुर्वीच्या सामाजिक कामाचा पक्ष संघटना मजबुत करणे व वाढीसाठी चांगला फायदा पक्षाला होईल असे मत जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी व्यक्त केले.

आपला,

संकेत नारायण डोके

उपजिल्हा प्रमुख,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.