वृत्तसंस्था/पालिका प्रशासन : नुकतेच सानपाडा येथे बेलापूर विधान सभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार विजय नाहटा
वृत्तसंस्था/पालिका प्रशासन : नुकतेच सानपाडा येथे बेलापूर विधान सभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार विजय नाहटा साहेब यांच्या प्रचार्थ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय नाहटा साहेबांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व येत्या काळात निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन केले. मार्गदर्शन शिबिरासाठी बेलापूर विधान सभेतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
यावेळी बोलताना विजय नाहटा म्हणाले की, आपला विजय निश्चित असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.आज आपल्या सोबत सर्व समाजातील ,जाती धर्मातील प्रतिष्ठित मंडळी सामील होत असून त्यांनीच आता बदल घडवण्याचे निश्चित केले आहे. सर्व धर्मियांचा आपल्याला पाठिंबा मिळत असून मतदार उत्साहाने कामाला लागला आहे. पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही म्हणून आळस झटकून कामाला लागा. ह्या घराणे शाहीला आपल्याला संपवायचे असून खऱ्या अर्थाने आपल्या मतदार संघाचा विकास करण्याच्या दृष्टीने बारा नंबरवर असणाऱ्या शिट्टी या चिन्हांचे बटन दाबण्याचे सांगण्यासाठी मतदार राजाला घरोघरी जाऊन भेटायचे आहे. आळस न करता मतदार राजाची भेट घ्या व त्यांना सांगा शिट्टीला मतदान म्हणजे विकासाला मतदान, शिट्टीला मतदान म्हणजे लोकशाहीला मतदान, शिट्टीला मतदान म्हणजे शिक्षणाला मतदान, शिट्टीला मतदान म्हणजे आपल्या स्वतःच्या परिसराच्या विकासाला मतदान. शिट्टीला मतदान म्हणजे तरुणांच्या हाताला रोजगार,शिट्टीला मतदान म्हणजे महिलांचा सन्मान,शिट्टीला मतदान म्हणजे आपल्या स्वाभिमानाला मतदान,शिट्टीला मतदान म्हणजे जेष्ठांचा सन्मान. म्हणून शिट्टीलाच मतदान करण्यासाठी मतदार राजाला जागृत करण्याचे अवाहन करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरास बेलापूर विधान सभेतील वाशी,तुर्भे,सानपाडा, नेरुळ,जुईनगर,सिवूडस, वाशीगाव,बेलापूर आगरोळी गाव, अशा विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित झाले होते.यावेळी कार्यकर्त्यांनी श्री.विजय नाहटा यांना निवडून देण्याचा मानस व्यक्त करत सर्वांनी एकमताने नाहटा साहेबांना निवडून देण्याचा ठराव पारित करण्यात आला. मार्गदर्शन शिबिरास नवतरुण आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.