अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन च्या वतीने १००० माथाडी कामगारांना आज मिळणार मोफत कोरोना प्रतिबंध ची लस !
नवी मुंबई: (प्रतिनिधी KTG समाचार)
कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांचा कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून बचाव होण्याकरीता अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्यावतिने व माथाडी हॉस्पीटल (ट्रस्ट) मार्फत बुधवार दि.०१ सप्टेंबर, २०२१ रोजी माथाडी भवन, तुर्भे, नवीमुंबई याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या १००० कामगारांना कोव्हीड-१९ संबंधीत मोफत लसीकरण करण्याचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला असल्याचे अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे चेअरमन व मा. आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहिर केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेल्या या कोव्हीड- १९ संबंधीत मोफत लसीकरण शुभारंग कार्यक्रमास माजी मंत्री आमदार गणेशजी नाईक, आमदार प्रसादजी लाड, निरंजन डावखरे, माथाडी कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदे, नवीमुंबई शिवसेना नेते विजयजी चौगुले, माजी आमदार संदिपजी नाईक, नवीमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, माथाडी हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, नवीमुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांची ऐतिहासिक चळवळ व मराठा आरक्षणाचा लढा उभा केला, त्यांच्या कार्याचा वारसा जतन करीत त्यांची अपुर्ण स्वप्न साकार करण्यासाठी माथाडी कामगार नेते मा.आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली असून, मराठा युवकांना उद्योजक करणे, मराठा समाज माथाडी कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षित करणे, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणे इत्यादी उहीष्ठांची पुर्तता करण्यासाठी मा. आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील प्रयत्न करीत आहेत.
कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या वतिने व माथाडी हॉस्पीटलच्या माध्यमातून मोफत लसीकरण होण्याकरीता मा.आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी त्यांचा ग्रोसरी बोर्डाकडे जमा असलेली ४ लाख ७८ हजार रुपये रक्कम अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनकडे जमा करुन इतर निधी उभारुन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कष्टकरी माथाडी कामगारांचे आराध्यदैवत, ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ व माथाडी कायद्याचे जनक स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ऐतिहासिक कार्याचा वारसा जतन करीत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतिने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, याच उपक्रमाव्दारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्यावतिने व माथाडी हॉस्पीटलच्या माध्यमातून १००० कष्टकरी माथाडी कामगारांना कोव्हीड-१९ संबंधित मोफत लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.*