मुंबईत महाविकास आघाडीचे जळगाव जिल्ह्याचे नेते एकत्र चर्चा मात्र गुल दस्त्यात
मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र ,अल्पावधीतच लोक प्रिय झालेले नवनियुक्त शिवसेना जिल्हा प्रमुख व काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकत्र आल्याने चर्चेला उधाण
मुंबईत महाविकास आघाडीचे जळगाव जिल्ह्याचे नेते एकत्र : चर्चा मात्र गुलदस्त्यात
KTG समाचार जळगाव
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जळगाव जिल्ह्य़ातील थोड्याच दिवसात चर्चेत आलेले नुतन शिवसेना जिल्हाप्रमुख सह कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मुंबईत एकत्र आल्याने भेटीतील चर्चा मात्र गुलदस्त्यात आहे*
जळगाव जिल्ह्य़ातील शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून नुकतीच पारोळ्याचे डॉ. हर्षल माने यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल शिवसेनेत काही नाराज तर काही खुष आहेत त्यामुळेच डॉ हर्षल माने हे जास्तच चर्चेत आले. यातच मुंबई येथे मंत्रालयात डॉ माने सोबतच कॉग्रेस चे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी सह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे खडसे समर्थक अनिल महाजन यांची भेट झाली. या भेटीचा फोटो सद्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले मात्र यांच्यात काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे