जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वड्री शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर दुर्घटना ,एक चा मृत्यू तर पायलट गंभीर जखमी
जळगाव -- *जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वड्री शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना **
Ktg समाचार जळगांव चंदू खरे ,
दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थीं विमान आहे ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात एका चा मृत्यु तर महिला पायलट गंभीर जखमी अवस्थेत. आदिवासी परिसर असल्याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे, चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी पोहचत आहेत.
दाट जंगल परिसरात
सदर घटना घडली आहे , घटनास्थळ राम तलाव परिसरातील सातपुडा पर्वत रांगेत असून, घनदाट जंगलाचा परिसर आहे.हा अपघात दुपारी चार च्या सुमारास घडल्याची माहिती उपस्थितांनी दिली, घटनास्थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे कठीण आहे.