सेक्टर १९ ई येथे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन
सेक्टर १९ ई येथे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन
सेक्टर १९ ई येथे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन
आज दिनांक २४/०६/२४ रोजी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख श्री संकेत नारायण डोके यांच्या नेतृत्वात सेक्टर १९ ई येथे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन परिसरातील नाल्याशेजारील रस्ता वारंवार पाठपुरावा करूनही पाम बीच रोडला जोडून नागरीकांसाठी उपयोगितेत आणला जात नसल्याच्या निषेधार्थ करण्यात आले. पालिकेच्या याच दिरंगाईचा फायदा घेत ‘जॅक इन्फ्रा’ या पालिका कंत्राटदाराने सदर रस्त्याचा वापर त्याचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे पत्र्याचे पक्के कुंपन घालून सुरू केला होता. यामुळे नवीन निर्माण केलेल्या या रस्त्याचे नुकसान देखील झाले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता सदर रस्ता पाम बीच रोडला जोडण्यासाठी व सदर रोडवर अनधिकृत कब्जा केलेल्या पालिका कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करून त्याला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावा व रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनवेळी विभाग अधिकारी श्री धांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळे धांडे यांनी समक्ष संबंधीत अभियंते श्री देशमुख व सुर्यराव यांना आदेश देऊन आंदोलनातील सर्व मागण्या मान्य केल्या.या आंदोलनात नवी मुंबई विकास अधिष्ठान चे कार्याध्यक्ष श्री.अशरफ शेख,शिवसेना विभाग प्रमुख श्री बाळकृष्ण खोपडे,श्री अरूण चौथमोल,श्री.अशोक पांचाळ,श्री.शिवाजी गडगुले,श्री मनोज वैश्य,सौ.सुनीता ढवळे,सौ.ललिता डोके,सौ.सुनंदा जाधव,सौ.अंजनाबाई पालवे,सौ.रूबी ठाकूर, शाखा प्रमुख दत्ता दिवाने, श्री.राहुलशेठ गव्हाणे,अली खाटीक,दशरथ पाथरोड,धनंजय चौथमोल व नागरीकांनीही सहभाग घेतला.तसेच पुढील १४ दिवसांत नागरिकांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास आणखी तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संकेत डोके यांनी दिला.