माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील ! - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नवी मुंबई : (प्रतिनिधी KTG समाचार) माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही,लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे कोव्हीड-१९ संबंधीत लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे, यासाठी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण हा उपक्रम आहे.
यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहिल, असे उद्गार राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे माथाडी हॉस्पीटलच्या माध्यमातून नवी मुंबईत माथाडी भवन येथे बुधवारी आयोजित केलेल्या मोफत लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते, ते पुढे असेही म्हणाले की, मोदीजींच्या ऐतिहासिक कार्याला चालना देणारा हा कार्यक्रम असून, देशात मोदीजींनी चार लसींची निर्मिती केली. आज जवळपास देशातील ५० कोटी जनतेचे लसीकरण पार पडले आहे. रोज ५० ते ६० लाख लोकांचे लसीकरण होत असून, येत्या डिसेंबरपर्यंत देशातील बहुतांश जनतेचे लसीकरण होऊन देश कोरानामुक्त होईल, असे प्रतिपादनही त्यांनी केले. यासाठी नरेंद्र पाटील हे पुढाकार घेऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. मला त्यांनी माथाडी कामगार चळवळीचे महत्व पटवून दिले आहे आणि मी माथाडी कामगार चळवळीची दखल सातत्याने घेत आहे आणि घेत राहिन त्यांनाही मी पटवून दिले आहे की, पद असो किंवा नसो सतत काम करा सकारात्मकदृष्टीने काम केले तर परिवर्तन नक्कीच होते, अशी ठाम अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला १० हजार लसीचे डोस उपलब्ध करुन देणार व ते लसीकरण झाल्यानंतर आणखी १० हजार लसीचे डोस देणार असल्याचे घोषीत केले व अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला एक रुग्नवाहिकाही देणार असल्याचे घोषीत केले.
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्यावतिने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत फाऊंडेशनचे चेअरमन व मा.आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले व मा. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार त्यांनी केला. तसेच नरेंद्र पाटील यांनी आपले प्रास्ताविक भाषण करताना म्हटले की, माझे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पद गेल्यानंतर मी देवेंद्रजींना भेटलो, त्यावेळी त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले व मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या हितासाठी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना करण्याचा मोलाचा सल्ला दिला आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचे आपण सुनियोजित आयोजन करु शकलो. देवेंद्र फडणवीसाहेबांचा पाठींबा व सहकार्य माथाडी कामगार संघटनेला, माथाडी कामगारांना ते मुख्यमंत्री आणि आतां विरोधी पक्षनेते म्हणून सातत्याने मिळाले आहे व यापुढेही राहिल, अशी आशाही नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची तसेच फाऊंडेशनला रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माथाडी युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केलेतर आभार प्रदर्शन फाऊंडेशनचे चेअरमन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले.
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्यावतिने माथाडी हॉस्पीटलच्या माध्यमातून आयोजित केलेल्या १००० नोंदीत माथाडी कामगारांचे कोव्हीड-१९ संबंधीत लसीकरण उपक्रमाच्या कार्यक्रमास नवीमुंबईचे नेते माजी मंत्री व आमदार गणेशजी नाईक, माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रसादजी लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार संदिपजी नाईक, माजी महापौर सागरजी नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, अॅड्. भारतीताई पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी हॉस्पीटल ट्रस्टचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे, मोहन गुरनानी, शंकरराव पिंगळे इत्यादी प्रतिनिधी, फाऊंडेशनचे सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्यावतिने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्यांचे लसीकरण शुभारंभ कार्यक्रमात झाले अशां माथाडी कामगारांना मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्रेही देण्यात आली.