शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 7.30 ह्या वेळेत काव्यमैफिल योग विद्या निकेतन वाशी येथे संपन्न झाली.

नवी मुंबई. शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 7.30 ह्या वेळेत काव्यमैफिल योग विद्या निकेतन वाशी येथे संपन्न झाली.

शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 7.30 ह्या वेळेत काव्यमैफिल योग विद्या निकेतन  वाशी येथे  संपन्न झाली.
शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 7.30 ह्या वेळेत काव्यमैफिल योग विद्या निकेतन वाशी येथे संपन्न झाली.

अखिल भारतीय साहित्य परिषद

व अप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषद आयोजित

रानकवी ना.धो.महानोर

ह्यांच्या  आठवणींना उजाळा-काव्यसरीतून अभिवादन व

स्वरचित कवितांचे सादरीकरण

 शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 7.30 ह्या वेळेत काव्यमैफिल योग विद्या निकेतन  वाशी येथे  संपन्न झाली.

          काव्यमैफिलीचे प्रमुख अतिथी पत्रकार/कवी अ.भा.सा. परिषद  कोकण प्रांत अध्यक्ष मा. श्री.दुर्गेशजी सोनार उपस्थित होते.तसेच काव्यमैफिलीत सहभागी कवी,श्रोतुवृंद  उपस्थित होते.नवी मुंबई साहित्य परिषद प्रमुख डॉ.अरुंधती जोशी ह्यांनी  श्री. दुर्गेशजी सोनार ह्याना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

     प्रमुख अतिथी मा.दुर्गेशजी सोनार

ह्यांनी रानकवी हे वेगळे कसे?त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये सहजसोप्या ओघवत्या शैलीत सांगितली.महानोर ह्यांच्या काही निवडक कविता त्यातील भावार्थ ,सौंदर्य स्थळे उलगडली. महानोर फक्त निसर्ग कवी नव्हते तर त्यांच्या कविता सामाजिक आशयालाही अनुसरून होत्या. त्यांच्या कविता कधीच  अश्लीलतेकडे झुकल्या नाहीत. *बघणं,ऐकणं*

*वाचन,लेखन*

 केलेच पाहिजे.

फक्त कार्यक्रमापुरते न वाचता कायम वाचन लेखन केले पाहिजे ह्यावर अधिक भर दिला.सहभागी कवी कवयित्रींना श्री.सोनार ह्यांच्या हस्ते गुलाबपुष्प,पेन देऊन कौतुक करण्यात आले.

   सहभागी काही  साहित्यप्रेमींनी ना.धो.महानोर ह्यांच्या कविता तर काहींनी स्वरचित कविता सादर केल्या.शाळकरी विद्यार्थी ते तरुण ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

       कार्यक्रमाचे प्रास्तविक, अतिथी परिचय,सुरुवातीचे सूत्रसंचलन  सौ.वृषाली  बापट  ह्यांनी केले.

    सौ.कल्पना देशमुख ह्यांनी सुरुवातीच्या सहभागी  कवींची नावे यादीवाचन केले.सौ.ऋतुजा गवस ह्यांनी सहभागी कवींची  नावे यादीवाचन  व नंतरचे सूत्रसंचलन  केले. 

   श्री.संतोष जाधव ह्यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक केले.

    नवी मुंबई साहित्य परिषद प्रमुख डॉ.नंदकिशोर जोशी,डॉ.अरुंधती जोशी,श्री.मोहन ढवळीकर  ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काव्यमैफिल संपन्न झाली.