ज्ञान विकास विद्यालयाच्या २००५ च्या इयत्ता १० वी च्या बॅचने साजरा केला आगळा वेगळा गेट टुगेदर
ज्ञान विकास विद्यालयाच्या २००५ च्या इयत्ता १० वी च्या बॅचने साजरा केला आगळा वेगळा गेट टुगेदर
ज्ञान विकास विद्यालयाच्या २००५ च्या इयत्ता १० वी च्या बॅचने साजरा केला आगळा वेगळा गेट टुगेदर
दिनांक - १३-०८-२०२३
स्थळ - कोपरखैरणे
ज्ञान विकास विद्यालयाच्या २००५ च्या इयत्ता १० वी च्या बॅचने साजरा केला आगळा वेगळा गेट टुगेदर
री-युनियन इयत्ता १० वि डी व्ही एस बॅच 2005 आणि ज्ञान विकास संस्था यांच्या सहकार्याने शाळेचे माझी विद्यार्थी यांचा गेट टुगेदर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्ञान विकास संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष ॲड. पी.सी. पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले
या कार्यक्रमाला ज्ञान विकास शाळेचे माझी अध्यक्ष श्री. गजानन पाटील साहेब, माध्यमिक वि. मुख्याध्यापक श्री. सुदाम कापडणीस सर, तसेच प्राथमिक विद्यालयाचे मु. जगन्नाथ दळवी सर आणी या सर्वांच्या सोबतीने शाळेत शिक्षक वर्ग सुद्धा उपस्थित होता..
१८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्व मित्र-मैत्रिनि या निम्मिताने एकत्र आले होते आणी सर्व जुन्या शाळेच्या आठवणी मध्ये रमुन गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेची घंटा वाजवून करण्यात आली. त्यानंतर प्रार्थना आणी राष्ट्रगीत घेण्यात आले सन्मामनीय अतिथी आणि शिक्षकवर्ग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन् करून पुढील कार्यक्रम सुरु केला. आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुछच, नारळ, सन्मानचीह देऊन सत्कार करण्यात् आला. तसेच आलेल्या प्रत्येक विद्यार्थी यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्माननीत करण्यात आले. रि- युनियन् ग्रूप तर्फे शाळेला सदिच्छा भेट म्हणून पुस्तक रुपी भंडार देण्यात आले, सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याच अनावरण करण्यात आले.
आलेल्या मान्यावर यांनी सर्व विद्यार्थी मित्र परिवाराला मोलाच मार्गदर्शन केले, कार्यक्रमात श्री. संतोष जाधव सर यांनी सादर केलेली कविता " भेटशील का मला तु १५ च्या नाक्यावर" याने पूर्ण सभागृह हर्षोल्हासित करून ठेवला.
तसंच आलेल्या मित्र परिवारातर्फे काहींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात आलेल्या जुन्या मित्र मंडळी द्वारा एक शालेय जीवन आणि कॉलेज जीवन या नाटिका सादर करण्यात तसेच, काहींनी सुंदर असे गाणे सुद्धा सादर केले.
तदनंतर केक् कट करून आणी ग्रूप फोटो क्लिक करण्यात आले. मग सर्वांनी स्नेहभोजन केले, तसेच त्यावेळी काही मित्र परिवार DJ च्या तालावर मस्त मनमुरादपाने डान्स करत् होता सर्व जण भेभान होऊन नाचू गाऊ लागले होते.
अशाप्रकारे नियोजित कार्यक्रम पार पडला. सर्वांनी या गेट-तुगेदर् चा आनंद घेतला आणी मौजमजा केली, तसेच एक दिवस अविस्मरणीय वेळ आपल्या जुन्या मित्रा-मैत्रिन् सोबत घालवून आयुष्याचे सोने केले.
या कार्यक्रमाचे आयोजन रि- युनियन् ग्रूप च्या वतीने करण्यात आले होते, त्यात या सदस्यांचा मोलाचा वाटा होता पूजा गवळी, सुषमा बोराटे, वैभव जगे, राहुल यादव, सतीश इरशेट्टी,मनोज भालेराव, कल्पेश पाटील आणी अजित म्हात्रे.