श्री.विजय नाहटा यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचे   ( कामगार सेल ) नवी मुंबई उपाध्यक्ष बाळकृष्ण खोपडे ( देशमुख) यांचा शिवसेनेत प्रवेश.

KTG समाचार  नवी मुंबई

  नवी मुंबईतील भारतीय जनता परतीच्या एकाधिकार शाहीला कंटाळून आणि सामान्य कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याची खंत व्यक्त करत भारतीय जनता पार्टी ( कामगार सेल) नवी मुंबई उपाध्यक्ष श्री.बाळकृष्ण खोपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते,पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती ( राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी शहर प्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख समीर बागवान,प्रदीप बी.वाघमारे,तुर्भे विभाग प्रमुख तय्यब पटेल,शिवसेना मागासवर्गीय सेलचे शहर प्रमुख राजू साळवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 
        यावेळी बाळकृष्ण खोपडे यांनी नाका कामगार, नवी मुंबईतील फेरीवाले यांच्या समस्या सोडवण्या बाबत श्री.नाहटा साहेबांना विनंती केली व यापुढे शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणा नुसार वाटचाल करण्याचे मनोगत व्यक्त केले. पुढील काळात नाका कामगार तसेच फेरीवाले बांधव यांच्या असणाऱ्या अडचणी संदर्भात समनधित कार्यालयाला भेटी देऊन असणाऱ्या अडचणी सोडवण्यात येतील असे श्री.विजय नाहटा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.