नवी मुंबई पालिका तुर्भे झोपडपट्टीत उभारणार सुसज्ज रुग्णालय

नवी मुंबई पालिका तुर्भे झोपडपट्टीत उभारणार सुसज्ज रुग्णालय !

नवी मुंबई पालिका तुर्भे झोपडपट्टीत उभारणार सुसज्ज रुग्णालय
नवी मुंबई पालिका तुर्भे झोपडपट्टीत उभारणार सुसज्ज रुग्णालय !

नवी मुंबई पालिका तुर्भे झोपडपट्टीत उभारणार सुसज्ज रुग्णालय !

तुर्भे झोपडपट्टीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुसज्ज रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी या भागात असलेले जिल्हा परिषदेचे गोडाऊन ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या असून सदरचे हे रुग्णालय उभे राहिल्यानंतर या भागातील गोरगरीब रुग्णांची वैद्यकीय उपचारासाठी होत असलेली परवड थांबण्यास मदत मिळणार आहे.
या संदर्भात काल शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.