महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांनी आज आरोग्य विषयक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांनी आज आरोग्य विषयक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
KTG समाचार प्रकाश माने नवी मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांनी आज आरोग्य विषयक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
याप्रसंगी राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी राज ठाकरे यांनी तळमळीने काही सूचना केल्या. तसेच त्यांनी सुचवलेल्या एका उपायाचा लाईव्ह डेमो देखील या बैठकीत दाखवण्यात आला. त्यांनी सुचवलेल्या या पर्यायांचा आरोग्य व्यवस्थेत नक्की समावेश करण्याबद्दल सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे यासमयी आश्वस्त केले.
याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव संजय खंदारे, राष्ट्रीय आरोग्य सेवा अभियान आरोग्य सेवा संचालक तुकाराम मुंढे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना, आरोग्य विभागातील सर्व प्रमुख वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.